केंद्रीय मंत्री मुरलीअण्णा मोहोळ यांची भेट
केंद्रीय मंत्री मा. मुरलीअण्णा मोहोळ यांच्यासोबत भारतीय पारंपरिक क्रीडांच्या संवर्धनासाठी आणि कुस्तीच्या गौरवशाली वारशाच्या जतनासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांवर अर्थपूर्ण चर्चा करण्याची संधी लाभली. तळागाळातील खेळाडूंना अधिक संधी उपलब्ध करून देणे आणि भावी कुस्तीपटूंना प्रोत्साहन देणे या सामायिक उद्दिष्टांबाबत या भेटीत सकारात्मक विचारविनिमय झाला.
