भूमिपूजन व पायाभरणी समारंभ
मल्लविद्या संस्कार कुस्ती फाउंडेशनच्या पायाभरणी समारंभासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अजय काशीद, रावसाहेब मगर, पंढरी अण्णा पठारे, पद्मविभूषण महाबली सतपाल, काशीद, ह.भ.प. आनंद शास्त्री महाराज आणि गुलाब बारडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. भारतीय कुस्तीचा समृद्ध वारसा जतन व संवर्धन करण्याच्या फाउंडेशनच्या प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.